लगोरिया मांडूनि पोरा
250.
लगोरिया मांडूनि पोरा वांटशील गडी ।
निर्बळाच्या संगे डाव देता येसी रडी ॥१॥
न करी ऐसे आता । करी गडी श्रीअनंता ॥२॥
मारिताचि लगोया आधी येतो हाता डाव ।
चुकलिया व्याहाण वाटी हासतात सर्व ॥३॥
निळा म्हणे वांयांविण नको पावो खेदा ।
याचिलागी न विसंगे श्रीहरि गोविंदा ॥४॥
