येई येई गरूडध्वजा ।
51.
येई येई गरूडध्वजा । विटे सहित करीन पूजा ॥१॥
धूप दीप पुष्पमाळा । तुज समर्पू गोपाळा ॥२॥
पुढे ठेवोनिया पान । वाढी कुटुंबी ते अन्न ॥३॥
तुम्हा योग्य नव्हे देवा । गोड करूनिया जेवा ॥४॥
विदूरा घरच्या पातळ कण्या । खासी मायबाप धन्या ॥५॥
द्रौपदीच्या भाजी पाना । तृप्ती झाली नारायणा ॥६॥
तैसी झाली येथे परी । म्हणे चोख्याची महारी ॥७॥
