वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ६, भुपाळ्या अभंग

कनकाच्या परियेळी उजळ

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073130 · अभंग क्र. ५०

50.
कनकाच्या परियेळी उजळूनि आरती । रत्नदीप शोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥
ओंवाळू गे माये सबाह्य साजिरा । राहि रखुमाबाई सत्यभामेच्या वरा ॥धृ॥
मंडित चतुर्भुज दिव्य कानी कुंडले । श्रीमुखाची शोभा पाहाता तेज फांकले ॥२॥
वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत । शंख चक्र गदा पद्म आयुधे शोभत ॥३॥
सांवळा सकुमार जैसा कर्दळी गाभा । चरणीची नेपुरे वांकी गर्जती नभा ॥४॥
ओंवाळीता मन हे उभे ठाकले ठायी । समदृष्टी समान तुकया लागली पायी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग