वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

विज्ञानाचे ज्ञान अज्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075004 · अभंग क्र. ५०

50.
विज्ञानाचे ज्ञान अज्ञानी घनवट ।
ज्ञाने अज्ञान नीट लाविले दिसे ॥
मी तू हे मात हरपले दृष्टांत ।
हृदयी हृदयस्थ निजतसे ॥
साकार निराकार शून्याशून्य दिठा ।
रुपी रुपवाटा हरि माझा ॥
बापरखुमादेविवरू हृदयस्थ घटी ।
बिंबोनी उफराटी कळा दिसे ॥

अर्थ :
प्रपंचाचे ज्ञान हे अज्ञानच असुन परमार्थ ज्ञानाने त्याला वाटेला लावले. त्यामुळे मनातील मी तु पण नष्ट होऊन हृदयात तो निजतेजाने स्थापित होतो. साकार निराकार शुन्याचे शून्य हे सर्व रुप घेऊन तो प्रगट झालेला माझा हरि आहे. असा जो रखुमाईचा पती हृदय घटात अवतरला तरी मूर्खाना तो वेगळा भासतो. असे माऊली बोलतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग