वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ६, भुपाळ्या अभंग

वाट पाहे बाहे निडळी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073116 · अभंग क्र. ५१

51.
वाट पाहे बाहे निडळी ठेवुनिया हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागले चित्त ॥१॥
कई येता देखे माझा मायबाप । घटिका बोटे दिवस लेखी धरूनिया माप ॥धृ॥
डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उताविळ भाव सांडुनिया देहे ॥२॥
सुखसेजे गोडचित्ती न लगे आणीक । नाठवे घर दार तहान पळाली भूक ॥३॥
तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येता मूळ देखेन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग