वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

पवित्र तो देह वाणी प

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072594 · अभंग क्र. ४९

49.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वेद अच्युत सर्वकाळ ॥१॥
तयाच्या चिंतने तरतील दोषी । जळतील रासी पातकांच्या ॥२॥
देव इच्छी रज चरणींची माती । धावत चालती मागे मागे ॥३॥
काय त्या उरले वेगळे आणिक । वैकुंठनायक जया कंठी ॥४॥
तुका म्हणे देव भक्तांचा संगम । तेथे ओघ नाम त्रिवेणीचा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग