चित्ती तुझे पाय डोळा
49.
चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥
हेचि एक तुम्हा मागतो मी दातारा । उचित ते करा भाव जाणोनी खरा ॥२॥
खुंटली जाणीव काही बोलणेची आता । कळो येईल तैसी करा बाळाची चिंता ॥३॥
तुका म्हणे आता नका देऊ अंतर । न कळे पुढे काय कैसा होईल विचार ॥४॥
