चित्त नाही शुद्ध जया
50.
चित्त नाही शुद्ध जयाचे अंतर ।
विषयी तत्पर सर्व काली ॥१॥
तया ज्ञान साधे असे तो घडेना ।
ज्ञानेवीण जाणा मोक्ष कैचा ॥२॥
नाही ज्या अपेक्षा साधनाची चाड ।
दोषाचा उघड वोतलासे ॥३॥
बहेणि म्हणे ज्ञान संतसंगे होय ।
चित्त जरी राहे सदा पायी ॥४॥
