अविद्येच्या वो रात्र
49.
अविद्येच्या वो रात्री । आडकलो अंधारी ॥1॥
तेथुनी काढावे गोविंदा । यशोदेच्या परमानंदा ॥2॥
तुझे सन्निधेचे पाशी । ठाव नाही अविद्येसी ॥3॥
तुझे संगती पावन । उद्धरिले ब्रह्मे पूर्ण ॥4॥
अजामेळ शुद्ध केला । ह्मणे दासी जनी भला ॥5॥
