कृष्णा लविवसे स्तनी
49.
कृष्णा लविवसे स्तनी । तिसी मारी चक्रपाणी ॥१॥
भयाभीत पडे प्रेत । जन विस्मय करीत ॥२॥
रडे तेव्हा माया । वांचलासी बा तान्हया ॥३॥
मिळोनिया समस्त । भाळी आंगारा लावीत ॥४॥
वसुदेवे सांगितले । नंद ह्मणे तैसे झाले ॥५॥
कुर्हादी आणिती । गात्रे निकुरे तोडिती ॥६॥
नामा ह्मणे दिला अग्नी । वास न माये गगनी ॥७॥
