वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

नेणती महिमा ब्रह्माद

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090084 · अभंग क्र. ४८

48.
नेणती महिमा ब्रह्मादिक भद्र । आणि ते महेंद्र नाना स्थानी ॥१॥
ते रुप खेळत गौळी याच्या संगे । पुंडलिका मार्गे भीमातीरी ॥२॥
उत्पत्ति उलथा न चले तो मार्ग । दुजियाचा संगनाही ज्यासी ॥३॥
निवृत्ति प्रगट गुरु मंत्र फळद । गोपाळ विग्दद ब्रह्म सेवी ॥४॥

अर्थ:
ब्रह्मदेव, इंद्रादिक देव हे हि ह्या परब्रम्हाचे स्वरुप जाणत नाहीत. आपल्या स्थानीचे मुख्य असलेले सुर्य चंद्र शेषादी ही ह्या स्वरुपाला पासुन अनभीज्ञ आहेत. तेच स्वरुप कृष्ण रुप घेऊन गोपिकांबरोबर खेळते व तेच पुंडलिका साठी भीमातीरी आले आहे. त्या स्वरुपाला सुरवात व अंत ही नाही व असंग असल्यामुळे कोणाशी ही संग नाही. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गहिनीच्या नाममंत्राचा सतत जप केल्याने त्या स्वरुपाची सेवा करुन तो मंत्र मला फलदायी झाला.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग