तुमचे तुम्हा जवळी अस
50.
तुमचे तुम्हा जवळी असता । वाया सिणालका सर्वथ हा ॥
हरि करुणानिधी मोठा । व्यापार टाका तुम्ही खोटा ॥
सांडा प्रकृती स्वभाव । तुम्हासारिखाची देव ॥
हरिस नाही बोल काही । वाया पडाल प्रवाही ॥
जैसे प्रकृतीस्वभाव । त्यासी तैसाची देव ॥
बोधला म्हणे पहा मनी । आणिक संता विचारुनी ॥
