वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

ऐसे सांगता माभळभटा ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089904 · अभंग क्र. ४८

48.
ऐसे सांगता माभळभटा ।
राया दचक बैसला मोठा ।
मग पाचारुनिया सुभटा ।
दैत्याप्रती काय बोले ॥१॥
म्हणे वाढविलेंती बहुता माने ।
अपार संपदा देऊनिया धने ।
आजि माझिया उपेगा येणे ।
बाळ कृष्ण्‍ वधणे भलत्यापरी ॥२॥
नाना विदया तुमच्या अंगी ।
रुपे पालटुनी विचरता जगी ।
मायारुपी म्हणऊनिया स्वर्गी ।
देवही भिती तुम्हासी ॥३॥
ऐसे असोनि माझिये गाठी ।
कायसी बाळका जळुची गोठी ।
तुमचेनी बळे हे सकळही सुष्टी ।
आर्चित झाली मजलागी ॥४॥
पूतना गेलीते तव नारी ।
दुसरा भट तोहि भिकारी ।
काय जाणो कैशापरी ।
देखोनी कळली तयासी ॥५॥
तो तव अंत्यंत सकुमार ।
सांगती अवघे लहान थोर ।
सुंदरपणाचीही बहार ।
रुपा आली कृष्णाकृती ॥६॥
तरी तुम्ही जाऊनिया तेथे ।
प्रेतरुपचि आणवा येथे ।
निळा म्हणे पाहोनिया त्याते ।
करऊ अक्षवाणे अपणा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग