वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

तेथे नाही मोल मायाचि

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-089992 · अभंग क्र. ५२

52.
तेथे नाही मोल मायाचि गणना । आपण ये़सणा ब्रह्मघडु ॥१॥
ते रुप साजिरे निर्गुण साकार । देवकीबिढार सेवियेले ॥२॥
नसंपडे ध्याना मना अगोचर । तो गोपवेषधर गोकुळी रया ॥३॥
निवृत्ति धर्मपाठ गयनी विनट । कृष्ण नामे पाठ नित्य वाचा ॥४॥

अर्थ:
त्याच्या स्वरुपाचे मोल करण्यास माया ही थिटी आहे. आपण किती ही केले तरी त्याच्या स्वरुपाला पोहचु शकत नाही. त्यास ब्रह्मस्वरुपाचे सगुण साकार रुप देवकीनी भोगले. जे स्वरुप ध्यान करुन ही सापडत नाही ते विनासायास गोपवेश घालुन गोकुळात आले. निवृत्तिनाथ म्हणतात जे धर्मपीठ श्री गहिनीनाथांनी भुषवले. त्या पिठात सतत कृष्णनामाचा घोष होतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग