सुंदर मुखकमळ कस्तुरी
52.
सुंदर मुखकमळ कस्तुरी मळवटी । उभा देखिला तटी भीवरेच्या ॥१॥
मकराकार कुंडले श्रवणी ढाळ । देती गळा वैजयंती मुक््तमाळा ॥२॥
शंख चक्र गदा पद्म चहू करी । गरूडवाहन हरी देखियला ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचे आगर । निरा भिवरा तीर विठ्ठल उभा ॥४॥
