वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

तव त्या रिठीयासी निघ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089946 · अभंग क्र. ५०

50.
तव त्या रिठीयासी निघाली वदने ।
अति विक्राळ दाढां दशने ।
श्रीकृष्ण कंठीचे रुधिरपान ।
करावया उदिते ॥१॥
कृत्रिमे जाणेनिया ते श्रीहरी ।
कवळूनि धरिली दोही करी ।
आणि घालूनिया मुखाभीतरी ।
चावुनी धरणिये टाकिली ॥२॥
त्याचे स्विष्टकृत केलियावरी ।
आक्रोशे पाळणियात रुदन करी ।
ते ऐकानि यशोदा सुंदरी ।
धंवली झाडकरी काय झाले ॥३॥
तव देखे शोणिताचे पूर ।
मांस मदाचे संभार ।
मग म्हणे गे मरमर ।
बाळ मासर्पे खादले ॥४॥
धाविल्या नरनारी बाळ ।
घात केला म्हणती सकळ ।
ऐसी कैशी गे तू वेल्हाळ ।
यशोदे मारविले बाळका ॥५॥
वाहाती शोणिताचे पुर ।
इतुके कैचे गे त्या रुधिर ।
काढूनिया पहा गे सत्वर ।
आहे प्राण की गेलास ॥६॥
निळा म्हणे जाउनी जवळी ।
काढूनि आणिला जो वनमाळी ।
तव हास्यवदन नित्य काळी ।
नाही कोमाइला ना दचकला ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग