वाउगे घरदार वाउगा सं
52.
वाउगे घरदार वाउगा संसार । वाउगे शरीर नाशिवंत ॥१॥
एक नाम सार वाउगा पसार । नामचि निर्धार तरती जन ॥२॥
वाउग्या या गोष्टी वाउग्या कल्पना । वाउग्या ब्रह्मज्ञाना कोण पुसे ॥३॥
वाउग्या व्युत्पत्ती वाउम्या शब्द आटी । वाउग्या ज्ञान गोष्टी बोलून काई ॥४॥
वाउगे ते मन स्थीर नाही तरी । मग कैचा हरी मिळे तया ॥५॥
वाउगे ते बोल बोलणे तोंवरीम्हणतसे महारी चोखियाची ॥६॥
