वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 18. महाशिवरात्री महात्म्य व अभंग › १. महाशिवरात्र अभंग

पापिष्टाचे जिणे काय

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072964 · अभंग क्र. ५२

52.
पापिष्टाचे जिणे काय ते जिवाले । गळा स्तन झाले शेळियेचे ॥१॥
येथेंचि जो खोटा तेथे तो करंटा । व्यर्थ आला पोटा माउलीचा ॥२॥
तप्त ताम्र भूमि लोळविती नरा । लेटिती अघोर नरकामाजी ॥३॥
लोहोचंबुकाग टोंचिती येवोनी । मारिताती घणी माथा घाव ॥४॥
वांधोनिया गळा टांगिती उफराटे । ह्मणताती सोटे वंरिच्यावरी ॥५॥
आसीपत्रावरी वोढिसी धरोनी । लेटिती नेउनी कुंभपाकी ॥६॥
जळतिया खाबा भेटविती बळे । खैरा़च्या इंगळे नाहाचिती ॥७॥
प्रळय क्रूर सर्प झोंबचिती कंठासी । ओढोनि जिव्हेसी खंड करिती ॥८॥
नामा ह्मणे ऐसी पापिष्ठाची गती । जन्म लक्ष शती हेचि फळ ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग