गार्हाणीं - अभंग ४८
48.
गार्हाणीं - अभंग ४८ ते ७७
उठोनि प्रातःकाळी गोपी येती घरा । आवरीं आवरीं यशोदे आपुलिया पोरा ॥१॥ थोर पीडीयेलें सांगता नये आम्हा । दही दूध तूप लोनी नासिलें सीमा ॥२॥ लेकी सुना पोरें वेडाविलीं सकळ । चोरी करिताती भुलविले सबळ ॥३॥ एका जनार्दनी आवरीं आपुला कान्हा । तुझा तुज गोड वाटे हांसतीस मना ॥४॥
