वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

तुझीया भेटीला जीव मा

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080961 · अभंग क्र. ४८

48.
तुझीया भेटीला जीव माझा तळमळी । केधवा वनमाळी येईल घरा ॥
येई गा बा हरि माझ्या प्राणनाथा । जीव जाईल आता करु काय ॥
माझिया देहीचा बैसकार केला । का रे नाही आला विठोबा माझा ॥
येई गा कृपानिधी बैस माझ्या घरि । तुज आता नाही उरी संसाराची ॥
हळुच तुज बुध्दी बैसविन घरि । तुज म्हणे अवतारी जाऊ नेदी ॥
बोधला म्हणे देवा कोण माझा केवा । आता येऊन द्यावा प्रेमपान्हा ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग