भक्त ऐसे जाणा जे देह
51.
भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारुनि ॥१॥
विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥२॥
निर्वाणी गोविंद असे मागे पुढे । कांहींच सांकडे पडो नेदी ॥३॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य । घातलिया भय नरका जाणे ॥४॥
