वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

थोर प्रभात हे झाली ।

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080973 · अभंग क्र. ५१

51.
थोर प्रभात हे झाली । उठ गे कृष्णे तू माऊली ।
आम्हा प्रेमपान्हा घाली । अगा तू कृष्णा जननीये ॥
तू तर माऊली आमची । थोर सावली संतांची ।
विश्रांती तुझिया नामाची । अगा तू कृष्ण जननीये ॥
आजची पूर्वकाळ थोर । गाई वत्सी करी एकधार ।
आम्हा दिना करि गा उध्दार । अगा तू कृष्ण जननीये ॥
बोधला म्हणे आवड देई । आणिक न मागे तुज काही ।
आवड तुझे पायी । अगा तू कृष्ण जननीये ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग