वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

नयन गोविले ध्यानी के

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075820 · अभंग क्र. ४९

49.
नयन गोविले ध्यानी केशवाच्या ।
श्रवण हरीच्या कीर्तनी हो ॥१॥
विवेके इंद्रिया दाखउनी सुख ।
गोविली आणिक नाठवती ॥२॥
वाचा हे गोविली नामसंकीर्तनी ।
सेवायुक्त पाणि केशवाच्या ॥३॥
पाय तीर्थयात्रा देवाच्या दर्शना ।
कर्मेंद्रिया-खुणा वोळखाव्या ॥४॥
दहाही इंद्रिये विवेके गोविली ।
मना तू निर्बळी याचियोगे ॥५॥
बहेणि म्हणे मना विषयसेवनी ।
न येती नेमोनी टाकिली ती ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग