वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

सारासार दोन्ही । न द

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074988 · अभंग क्र. ५१

51.
सारासार दोन्ही । न दिसती नयनी ।
अवचिता गगनी बिंबलासे ॥
लोपले रविशशी । तेज न भाये आकाशी ।
मेघेःशामे मेघाशी लपविले ॥धृ॥
दिव्य रूप तेज । तीव्र ना तेजबीज ।
कुंडली विराज । लोपले सुर्यो ॥
ज्ञानदेवा ध्यान । मनाचेंही मन ।
हरिचरण स्थान । दृढ केले ॥

अर्थ :
सार असारचे रुप असलेले ते स्वरुप डोळ्याना दिसत नाही पण अवचित गगनात बिंबते. त्याच्या तेजाने आकाशातील चंद्र सुर्य हे त्या तेजात लोपले आहेत. ते तेज त्या आकाशात मावत नाही. जणुकाही त्या मेघःशामाने मेघालाही झाकुन टाकले. कुंडलिनी जागृत झाल्यावर जे दिव्य तेज त्या रुपावर निर्माण होते. ते तेज तिव्र नाही व त्यात सुर्य लोपला आहे. आम्ही मनाचे मन असलेले ते ब्रह्मपद त्या समचरणांमध्ये पाहतो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग