पुतनाप्राण शोषण
48.
पुतनाप्राण शोषण
कंसे पाठविली मायावी पूतना । देवोनिया स्तना बाळे मारी ॥१॥
दीन दुर्बळांची मारीत बाळके । करीताती शोक माय- बाप ॥२॥
गहिंवरोनि तेव्हा पुसे परीक्षिती । भगवंताची मूर्ती बा-ळरूप ॥३॥
अभय देतसे बापा नको रडू । ते काय घुंगर्डू मारू शके ॥४॥
जेथे पुराण कीर्तन होत नामघोष । तेथे यम त्रास घेत असे ॥५॥
पळती तेथूनि असुरादिक वैरी । तेथे नाही थोरी पाप तापा ॥६॥
नामा ह्मणे आलीए नंदाचिये घरी । स्वरूप सुंदरी देवांगना ॥७॥
