वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

दिनांचा दयाळू पतितां

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-081010 · अभंग क्र. ५२

52.
दिनांचा दयाळू पतितांचा पावन । सर्वसुखनिधान पांडुरंग ॥
घडी घडी आठव करावा तयांचा । धोका कळीकाळाचा नाही त्यासी ॥
पांडव जयाने रक्षीले जो हरि । ते नेले विवरी काढूनिया ॥
प्रल्हादाचा पिता चिंतीत वोखटे । करितसे गोमटे वेगळाची ॥
बांधोनी पाषाण सागरी लोटिला । तो पहा तारिला वरचेवरी ॥
जैसे आणिक पतित बहु उध्दरिले । आठवा रे पाऊले त्यांची वेगी ॥
बोधला म्हणे ऐशा देवा शरण जावे । भवसागर तरावे हेळामात्रे ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग