वनभोजन समयी शकाटसुरन
51.
वनभोजन समयी शकाटसुरनाश
करावया वनभोजन । जाती गोकुळींचे जन ॥१॥
भोजन करिती । कोणी देवा खेळविती ॥२॥
डोळे झांकीत श्रीपती । दवी निद्नेची आकृती ॥३॥
बहुत खेळलासे खेळा । आता निजवागे बाळा ॥४॥
वस्त्रे घालुनी शकटातळी । निजविती वनमाळी ॥५॥
क्षणक्षण निजला देव । रडे उठे वासुदेव ॥६॥
मुलालागी ह्मणे तेव्हा ।माझा कान्होबा खेळवा ॥७॥
रागेंरागे झाडी लात । गाडा मोडोनी पाडीत ॥८॥
नामा ह्मणे वाटी धन । नंद वांचला नंदन ॥९॥
