यावरी कंस म्हणे दैत्
52.
यावरी कंस म्हणे दैत्यादिका ।
वधूनि येईल जो बाळका ।
त्यासी अर्ध राज्याची टीका ।
दूईन छत्र सिंहासन ॥१॥
मग तृणावर्त धेनुकासुर ।
मग केशिया शकटासुर ।
अघासुर सर्पविखार ।
चालिले भार दैत्यांचे ॥२॥
कृष्णे ते ते संहारिले ।
नवल अदभुतचि वो केले ।
निळा म्हणे आहे वर्णिले ।
श्रीवेदव्यासे पुराणी ॥३॥
