वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

मग म्हणती अवघ्या जणी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089915 · अभंग क्र. ५१

51.
मग म्हणती अवघ्या जणी ।
धावोनि पहागे आणा पाणी ।
डास वरखडला न्याहाळुनी ।
रक्त कोठुनी स्त्रवले हो ॥१॥
पहाती तव तो उत्तम अंगे ।
जेवि का उठियले अनंगे ।
नभापरी अलिप्त संगे ।
काय करिती अघात त्या ॥२॥
नानापरिंची अक्षवाणे ।
करी यशोदा वांदी दाने ।
यथाविधी व्दिजभोजने ।
केले जिताणे श्रीहरीचे ॥३॥
म्हणती नवीची रिठियाची माळा ।
घातली होती त्वा याचिया गळा ।
ते काय झाली गे याची वेळा ।
तेचि अरिष्ट यासी होते ॥४॥
ऐसा झाला घोषगजर ।
ऐकोनिया तो कंसासुर ।
म्हणे बोळविला महावीर ।
केला चकाचुर रिठाही ॥५॥
करिता उपाय न चले यासी ।
कंस भयाभीत मानसी ।
म्हणे काळ हा जन्मला आम्हासी ।
करील संहार काळाचा ॥६॥
निळा म्हणे न चले युक्ती ।
यापुढे कापटया समाप्ती ।
सर्वातरवासी हा श्रीपती ।
कर्मफळदाता निजसत्ते ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग