वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 231. सुदामचरित्र

सुदामचरित्र.

🙏 4. संत नामदेव · ABH-083953 · अभंग क्र. २२१३

2213.
सुदामचरित्र.

सुदामा ब्राह्मण होता तो दुर्बळ । परि चित्ती गोपाळ द्दढ धरिला ॥१॥
तयाचे चरित्र ऐका सावधान । तेणे जन्ममरण दूर होती ॥२॥
सत्वाचा सागर धैर्याच मांदार । भक्तीचा निर्धार तयापाशी ॥३॥
हालेना चालेना चळेना ढळेना । आणिक कल्पीना इच्छा कांही ॥४॥
सदा सर्वकाळ समाधी लागला । प्रपंच सांडिला छेदूनिया ॥५॥
नामा म्हणे तोचि योगियांचा राजा । ज्ञान्याचीया पूजा पुजतसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग