भाविकांची आवड मोठी ।
2232.
भाविकांची आवड मोठी । धांवे पाठी रानोरान ॥१॥
कण्या खाये विदुराच्या । उच्छिष्ट गोवळ्यांचें परमप्रिय ॥२॥
उच्छिष्ट फळे भिल्लिणीचीं । खायें रुचे आदरे ॥३॥
पोहे खाये सुदाम्याचे । कोरडे फके मारी साचे ॥४॥
ऐशी भक्ताची आवडी देवा । एका जनार्दनी करी सेवा ॥५॥
