वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

नव्हती ते संत करिता

🙏 3. संत तुकाराम · ABH-077839 · अभंग क्र. २२२१

2221.
नव्हती ते संत करिता कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥१॥
येथे नाही वेश सरत आडनावे । निवडे घावडाव व्हावा अंगी ॥धृपद॥
नव्हती ते संत धरिता भोंपळा । करिता वाकळा प्रवार्णाशी ॥२॥
नव्हती ते संत करिता कीर्तन । सांगता पुराणे नव्हती संत ॥३॥
नव्हती ते संत वेदाच्या पठणे । कर्म आचरणे नव्हती संत ॥४॥
नव्हती संत करिता तप तीर्थाटणे । सेविलिया वन नव्हती संत ॥५॥
नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणे । भस्म उधळणे नव्हती संत ॥६॥
तुका म्हणे नाही निरसला देहे । तो अवघे हे सांसारिक ॥७॥

अर्थ :
कवित्व केले म्हणजे संत होत नाही किंवा संतांचे आप्तेष्ट नातेवाईक आहेत म्हणून नातेवाईक संत होत नाही. येथे केवळ संता सारखा वेश आहे म्हणून किंवा संतांचे आडनांव आहे म्हणून संत होत नाही तर जगाचे विविध प्रकारचे घाव डाव सहन करून संतपद प्राप्त होते. हातात भोपळा घेतला आणि वाकळाचे प्रावरण म्हणजे पागरून घेतले म्हणजे संत होत नाही. किर्तन केले म्हणजे संत होत नाही पुराणेकथा सांगितले म्हणजे संत होत नाही. वेदाचे पठण केले किंवा कर्माचरण केले म्हणून कोणी संत होत नाही. तीर्थाटन केल्याने किंवा तप अनुष्ठान केल्याने किंवा वनात जाऊन राहिल्याने कोणी संत होत नाही. माळ मुद्रांचे पोषण केले आणि भस्म उधळले तर कोणी संत होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत देहाविषयी ज्ञान आहे आणि ज्याच्या ठिकाणी देह भावना आहेत तोपर्यंत ते सर्व संसारीकच आहेत असे समजावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग