भक्तासी संकट पडता ।
2229.
भक्तासी संकट पडता । धांवे देव तत्त्वता लवलाहे ॥१॥
ऐसा अनुभव आहे । देव लवलाहे धांवत ॥२॥
द्रौपदी पडता संकटीं । धांवे उठाउठी देव तेव्हा ॥३॥
पडता संकट प्रल्हादासी । कोरडे काष्ठेंसी देव जाहला ॥४॥
पडता संकट गजेंद्रासी । हाकेसरसी उडी घाली ॥५॥
एकाजनार्दनी निर्धार । स्मरतां साचार धांवत ॥६॥
