वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

अमर तू खरा । नव्हे क

🙏 3. संत तुकाराम · ABH-078324 · अभंग क्र. २२१९

2219.
अमर तू खरा । नव्हे कैसा मी दातारा ॥१॥
चाल जाऊ संतांपुढे । वाद सांगेन निवाडे ॥धृपद॥
तुज नांव जरी नाही । तरी माझे दाव काई ॥२॥
तुज रूप जरी नाही । तरी माझे दाव काई ॥३॥
खेळसी तू लीळा । तेथे मी काय वेगळा ॥४॥
साच तू लटिका । तैसा मी ही म्हणे तुका ॥५॥

अर्थ :
हे दातारा तु अमर आहे ही गोष्ट तर खरीच आहे परंतु मी ही तुझ्याप्रमाणे अमर कसा नाही ते मला सांग? मीहि तुझ्या साराखच अमर आहे. मी अमर नाही असे जर तुझे म्हणणे असेल तर चल आपण दोघेही संता पुढे जाऊ आणि त्यांच्यापुढे आपला वाद मांडू मग ते आपल्या वादाचा निवाडा करतील. तुला जर नांव नाही तर मला तरी कुठे आहे ते दाखव? जर तुला रुप नाही तर माझे खरे स्वरूप कोणते आहे ते मला दाखव? देवा अरे तु अनेक अवतार घेतलेस अनेक अवतारा मध्ये वेगवेगळ्या लीला केल्यास त्यावेळी तुझ्याबरोबर मी ही होतो बरे, वानर, गोपाळ, सेवक या रूपाने मी ही तुझ्या बरोबरच होतो मग तेथे तु आणि मी वेगळा आहोत काय? तुकाराम महाराज म्हणतात देवा तु जर खरा व खोटा दोन्ही आहेस तर मी ही तुझ्याप्रमाणेच आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग