वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

डोळ्यामध्ये जैसे कणु

🙏 3. संत तुकाराम · ABH-077968 · अभंग क्र. २२१०

2210.
डोळ्यामध्ये जैसे कणु । अणु तेंहि न समाये ॥१॥
तैसे शुद्ध करा हित । नका चित्त बाटवू ॥धृपद॥
आपल्याचा कळवळा । आणिका बाळावरी न ये ॥२॥
तुका म्हणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥३॥

अर्थ :
डोळ्यामध्ये धुळेचा एक बारीक कण देखील सहन होत नाही. त्याप्रमाणे आपले हीत होण्यासाठी आपले चित्त शुद्ध करा आणि पापाच्या थोड्या देखील विटाळाने आपले चित्त बाटवू नका. आपला जसा आपल्या बालकांवर प्रीतीचा पान्हा असतो तसा इतर बालकांवर नसतो, म्हणजेच असेही आपण करू नये. तुकाराम महाराज म्हणतात शेतकरी जसा पुढे आपल्याला चांगले पीक मिळावे यासाठी बीज सुरक्षित जपून ठेवतो त्याप्रमाणे पुढे आपले अनहित होऊ नये म्हणून आपले चित्त शुद्ध ठेवावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग