पुढे तो भिकारी जाता
2232.
पुढे तो भिकारी जाता झाला वेगे । आपुलिया रंगे रंगूनिया ॥१॥
येकाकार करी चित्त आणि वृत्ति । पाहे लक्ष्मीपति दुरोनिया ॥२॥
तटस्थ जाहाला चालला त्वरित । मुखी नाम गात गोविंदाचे ॥३॥
नामा म्हणे नीर पाझरे लोचनी । समाधी लागुनी मुनी ठेला ॥४॥
