बैसायासी गेलो पितीया
2206.
बैसायासी गेलो पितीयाचे अंकी । उठविले एकी माउलीने ॥१॥
सरेना सरेना कोणी उठवीना । ऐसा ठाव जाणा वांछितसे ॥२॥
उपाय न कळे मागावे कोणासी । भावना आपैसी उठावली ॥३॥
नामा म्हणे शब्द ऐके देवऋषी । मग त्या बाळकासी आश्वासीते ॥४॥