मागे बहुता जन्मी हेच
2218.
मागे बहुता जन्मी हेचि करित आलो आम्ही । भवतापश्रमी दुःखे पीडिली निववू त्या ॥१॥
गर्जो हरीचे पवाडे मिळो वैष्णव बागडे । पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये ॥धृपद॥
भाव शुद्ध नामावळी हर्षे नाचो पिटू टाळी । घालू पाया तळी । कळीकाळ त्याबळे ॥२॥
कामक्रोध बंदीखाणी तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियांचे धणी आम्ही जालो गोसांवी ॥३॥
अर्थ :
आम्ही मागे खूप जन्म घेतले आणि त्याच्या तही, जे या भवसागराच्या तापाने तप्त दुःखी-कष्टी श्रमी झालेत त्यांना आम्ही सुखी केले व पुढे हेच करत आलो आहोत. भोळे भाबडे वैष्णव गोळा करून हरी नामाचे पवाडे गर्जून सांगण्यचे काम केले. आणि जे पाशन हृदयाचे माणसे असतील त्यांच्या देखील हृदयातून आम्ही भक्तीचा पाजर काढू. शुद्ध भक्तिभाव याच्या जोरावर हरीचे नामावळी गाऊ त्या छंदात नाचू आणि टाळी वाजू. याच बळावर आम्ही त्या कळीकाळाला आमच्या पायाच्या तळाला घालू. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काम क्रोधाला बंदिखान्यात टाकले आहे. आणि आम्ही इंद्रियाचे धनी (गोसावी) झालो आहोत.
