शुभसूचचिन्हे होताती
2224.
शुभसूचचिन्हे होताती शकुन । तेणे तो ब्राह्मण आनंदला ॥१॥
म्हणे थोर लाभ आजिचा दिसतो । आनंद वाटतो मनामाजी ॥२॥
उडती उजवे काग ते जोडयाने । भरल्या कुंभाने नारी देखे ॥३॥
तास भारद्वाज वामभागी जाती । मयूर नाचती उत्साहाने ॥४॥
नामा म्हणे सर्व प्रश्नांचाही प्रश्न । वाचे नारायण नाम गातो ॥५॥
