वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

नावडावे जन नावडावा म

🙏 3. संत तुकाराम · ABH-078212 · अभंग क्र. २२०७

2207.
नावडावे जन नावडावा मान । करूनि प्रमाण तू चि होई ॥१॥
सोडवूनि देहसंबंध वेसने । ऐसी नारायणे कृपा कीजे ॥धृपद॥
नावडावे रूप नावडावे रस । अवघी राहो आस पायापाशी ॥२॥
तुका म्हणे आता आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसे ॥३॥

अर्थ :
हे नारायणा मला जन आवडू नये, मला मान-सन्मान आवडू नये तुच प्रमाणभुत माझ्यासाठी होऊन राहा. या देहा संबंधी जेवढे काही म्हणून व्यसने आहेत ती सर्व सोडवण्याची कृपा नारायणाने माझ्यावर केली पाहिजे. देवा मला तुझ्या रूपा वाचून आणि तुझ्या ब्रम्ह रसावाचून इतर कोणतेही रुप किंवा रस आवडू नये. केवळ तुझ्या पाया पाशीच माझी सर्व इच्छा असावी. तुकाराम महाराज म्हणतात ये अनंता मी तुम्हाला जे काही मागितले आहे ते तुम्ही तुमच्या सत्तेने करून ठेवा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग