भक्तालांगीं अणुमात्र
2202.
भक्तालांगीं अणुमात्र व्यथा । ते न साहवे भगवंता ॥१॥
करुनी सर्वांगाचा वोढा । निवारीतसे भक्तपीडा ॥२॥
होउनी भक्ताचा अंकितु । सारथीपण तो करीतु ॥३॥
प्रल्हादासी दुःख मोठें । होतांची काष्ठी प्रगटे ॥४॥
ऐसा अंकित चक्रपाणी । एका शरण जनार्दनी ॥५॥
