आश्वासोनी देव बोलिले
2210.
आश्वासोनी देव बोलिले ध्रुवासी । इच्छा तुझी जैशी तैसे करू ॥१॥
सहज सत्येने ऐसे कांही जहाले । अढळ दिधले बैसावया ॥२॥
चंद्र सूर्य तारा शशि ऋषी भोर । हे ज्या आधारे हिंडताती ॥३॥
ब्रम्हलोक साचे परी ते न नासे । ऐशा परी त्यास बैसविले ॥४॥
क्षतेचा दिवस योजने उन्नती । बेसवी श्रीपति ध्रुवालागी ॥५॥
सवी सर्वत्नांच्या लोचना गोचर । रमणीये अपार वर्णवेना ॥६॥
नामा म्हणे दुजे वैकुंठ केवळ । भक्तालागी केले देवराये ॥७॥
