वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 229. धृवचरित्र

स्तवीनसे वाचे जोडोनि

🙏 4. संत नामदेव · ABH-083936 · अभंग क्र. २२०९

2209.
स्तवीनसे वाचे जोडोनिया कर । वेदा अगोचर ऐसे कांही ॥१॥
धन्य धन्य आता उद्धरलो स्वभावे । माझे मज ठावे झाले निज ॥२॥
विश्वाच्या विसांव्या जिवाचिया जिवा । देवाचिया देवा दिनानाथा ॥३॥
सूंचि सर्वा आदिमायची अवधी । तुजविण कधी दुजे नाही ॥४॥
एक तू अनेक अनेकी तू एक । येणेही सांशंक बोलवेना ॥५॥
दातृत्वाची आदी कल्याणाची निधी । चित्तमन बुद्धि सर्व तूंची ॥६॥
तुझीये कृपेने गेले भावाभाव । आणिक मागावे ऐसे नाही ॥७॥
कधींही कोणता चळेना ढळेना । माते ऐशा स्थाना बैसवावे ॥८॥
नामा म्हणे ऐसी करीत प्रार्थना । घाली लोटांगणा पायांवरी ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग