ठेवुनी भोंवताले रक्ष
2200.
ठेवुनी भोंवताले रक्षणाला दूत । सांगतो तयाते सत्तारूपे ॥१॥
तुम्ही आता याचे करावे रक्षण । व्याघ्र सिंह येणे बाधा नव्हे ॥२॥
क्षणाक्षणा माते सांगावा वृत्तांत । वनी भूत प्रेत हिंडताती ॥३॥
चोर हेर खळ रात्निचीये वेळे । रहावे भोंवताले सावधान ॥४॥
नामा म्हणे ऐसे सांगे त्या दुतांसी । आपण घरासी येता झाला ॥५॥
