कासया साधन तपाचिया ह
2224.
कासया साधन तपाचिया हावा । पाचरितां धावो येतो लवलाही ॥१॥
ऐसा अंकिला धांवे वचनासाठी । पहा जगजेठी भक्तकाजा ॥२॥
संकटीं पडला गजा नक्रमिठी । धांवे उठाउठी ब्रीदासाठीं ॥३॥
अळीकर धांकुटा ध्रुव बैसे वनी । तयासी तत्क्षणी अढळ केले ॥४॥
पडता संकट द्रौपदी करी धांवा । धांवे लवलाह्मा सारुनी ताट ॥५॥
एका जनार्दनी भक्तकाज कैवारी । धांवे सत्वारी आपुल्या लाजा ॥६॥
