वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 229. धृवचरित्र

नारदे पाहिली बाळकाची

🙏 4. संत नामदेव · ABH-083918 · अभंग क्र. २२०५

2205.
नारदे पाहिली बाळकाची स्थिती । त्याच्या चित्ती शांती भरली दिसे ॥१॥
कल्पनेचा दाणा म्हणे तयालागी । बाळा कवणालागी आठविसी ॥२॥
वय तरी थोडे भावना उदंड । काय तुज चाड सांग आता ॥३॥
न बोलसी तरी साधेना हे काज । अंतरींचे नीज मज कळे ॥४॥
आला लाभ काळ फळलीसे भावना । उघडोनी लोचना पाही मज ॥५॥
ऐकोनी ध्रुवाने सज्जनाची वाणी । नेत्र विकासोनी पाहे तदा ॥६॥
पुढे उभा मुनि लावण्याचा गाभा । आपुलिया लाभालागी नाचे ॥७॥
नामा म्हणे ध्रुवे वंदिले चरण । बोलिले वचन ऐका आता ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग