भक्तचरणींचे रजः कण ।
2223.
भक्तचरणींचे रजः कण । हृदयी वाहे नारायण ॥१॥
भक्ता पडता संकट । देव अंगें सोशी कष्ट ॥२॥
गांजितां प्रल्हादा नेहटीं । स्वये प्रगटला कोरडे काष्ठी ॥३॥
द्रौपदी गांजितां तात्काळीं । कौरवांचीं तोंडे केली काळी ॥४॥
गोकुळीं गांजितां सुरपती । गोवर्धन धरिला हाती ॥५॥
अर्जुनांतें संकटप्राप्ती । दिवसां लपवी गभस्ती ॥६॥
अंबऋषीचें गर्भवास । स्वये सोशी हृषीकेश ॥७॥
एका जनार्दनी दास । होय भक्तांचा सावकाश ॥८॥
