ऐसे कांही एक अपूर्व
2208.
ऐसे कांही एक अपूर्व देखिले । ह्रदयी कोंदाटले मूर्तिरूप ॥१॥
परी ते कांही तैसे न राहे निश्चळ । चित्त ते चंचळ मावारले ॥२॥
पुढती सायास करी नानापरी । न राहे अंतरी साचोकारे ॥३॥
आवडीने जीव झाला कासावीस । तंव त्या परेशास कृपा आली ॥४॥
ब्राम्हाणाचे रूप उभा ठेला पुढे । निज भक्तांचे कोडे परवावया ॥५॥
कपोलासी शंख लाविला स्वहाते । तेव्हांचि तयाते ज्ञान झाले ॥६॥
वैकुंठ पिठीचे अधिष्ठान साचे । ते रूप तयाचे द्दष्टी पडे ॥७॥
नामा ह्मणे काय सांगावा नवलावो । भक्तांलागी देवो साहकारी ॥८॥
