वाचे नाम गात चालिला
2223.
वाचे नाम गात चालिला तो द्विज । एकाचे ते चोज शुद्ध भावे ॥१॥
जीवशिव एकाकार झाली वृत्ति । नाही कांही चित्ती शमदम ॥२॥
हात पाय नळ्या वळती फेंगडया । भावार्थाच्या गुडया उभारीत ॥३॥
नामा म्हणे वाट चालता समाधि । सोह स्वरूपी बुद्धि ठसावली ॥४॥
