शुद्ध करूनियां मन ।
2207.
शुद्ध करूनियां मन । नारायण चिंतावा ॥१॥
मग उणें नाही काही । प्रत्यक्ष पाही अनुभव ॥२॥
आठवितां उपमन्यु बाळ । दिला क्षीरसागर सुढाळ ॥३॥
ध्रुवें चिंतिलें चरणा । अधळपदीं स्थापिले जाणा ॥४॥
बिभीषणें केला नमस्कार । तया केले राज्यधर ॥५॥
विष पाजिलें पूतना । पाठविली वैकुंठसदना ॥६॥
गणिकेंनें आठविलें । तैसी वैकुंठीं बैसविलें ॥७॥
हनियाती कुब्जादासी । जाहली प्रिय ती देवासी ॥८॥
अर्जुनाच्या भावार्थासाठीं । रथ हांकी जगजेठीं ॥९॥
गोपाळांची आवड पोटी । उच्छिष्टासाठी लाळ घोटी ॥१०॥
विदुराच्या भक्षा कण्या । तेणे आवडी मानी मना ॥११॥
एका शरण जनार्दनी । दासां न विसरें चक्रपाणी ॥१२॥
